Kikvi Project Deal : किकवी प्रकल्प व्यवहाराच्या कोणत्याही चौकशीस तयार माजी संचालकांचा खुलासा; करार पारदर्शी

Ex-Directors Say Land Purchase Was Transparent : ‘गोकुळ’च्या पुण्यातील किकवी प्रकल्पासाठी जागा खरेदीचा व्यवहार पारदर्शक आणि नियमानुसार झाल्याचा दावा माजी संचालकांनी केला आहे.
Kikvi Project Deal

Kikvi Project Deal

esakal

Updated on: 

कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या पुण्यातील किकवी येथील प्रकल्पाचा व्यवहार पारदर्शी आणि नियमानुसारच झालेला आहे. कोणत्याही चौकशीसाठी तयार असल्याचे स्पष्टीकरण माजी संचालकांनी दिले. यासंदर्भात वारंवार प्रश्न विचारणाऱ्यांना आम्ही यापूर्वीच जाहीर उत्तरही दिल्याचा दावा माजी संचालकांनी पत्रकाद्वारे केला.

पत्रकात म्हटले आहे, पुणे येथे ३० वर्षांपासून गोकुळ दूध संघ म्हशीच्या व गायीच्या दुधाची विक्री करत आहे. पुण्यात गोकुळची स्वतःची पॅकिंग युनिटची गरज होती. चार वर्षांत संचालक मंडळाने मुंबई आणि पुण्यामध्ये स्वतःची जागा खरेदी करून प्रोसेसिंग व पॅकिंग प्लांट उभारण्याचा निर्णय घेतला. पुण्यातील पॅकिंग प्लांटच्या जागा खरेदीसाठी दोनवेळा निविदा मागविल्या होत्या. हा निर्णय नियमानुसार केलेला आहे.

Kikvi Project Deal
उच्चांकापासून चांदी १.९४ लाखांनी स्वस्त, सोन्याच्या भावातही मोठी घसरण; ५ दिवसात भाव कोसळले?

याबाबत केंद्र सरकारच्या सी. व्ही. सी. गाईडलाईनचे पालन केले आहे. पत्रकावर माजी अध्यक्ष नविद मुश्रीफ, विश्वासराव पाटील, अरुण डोंगळे, अजित नरके, किसन चौगुले, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, अमरसिंह पाटील, अंबरिषसिंह घाटगे, बाळासाहेब खाडे, एस. आर. पाटील, सुजित मिणचेकर, युवराज पाटील आणि मुरलीधर जाधव यांची नावे आहेत.

पुराव्यानिशी सिद्ध करू..!

चौकशी समितीचे सहायक निबंधक कृष्णा ठाकरे यांच्या अहवालावरून अनियमिततेचा आकडा ५० कोटींवरून खाली येऊन १३ कोटींवर आलेला आहे. आता राहिला प्रश्न या १३ कोटी अनियमिततेच्या आरोपाचा. या जागेला आजही बाजारात दहा कोटी रुपये जादा देऊन म्हणजेच ९० कोटींचे गिऱ्हाईक तयारच आहे. हे पुराव्यानिशी सिद्ध करू, असेही पत्रकात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com