

Gokul Directors Mumbai Visit
esakal
Gokul Milk Union Political Update : गोकुळ दूध संघाच्या राजकारणात संचालकांच्या सहलीचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. महायुतीचे संचालक आज (ता. ४) कोल्हापूर विमानतळावरून मुंबईच्या दिशेने रवाना झाले. मुंबईत मंत्रिमंडळाची बैठक असल्याने प्रथम महायुतीच्या नेत्यांची भेट घेऊन त्यानंतर हे संचालक अलिबागला जाणार आहेत. अलिबागमधून पुढे कोकण पर्यटनाचा त्यांचा बेत असल्याची माहिती समोर आली आहे.