
Kolhapur Politics : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) ठरावासाठी तालुकानिहाय कार्यकर्ते नेमले आहेत. प्रत्येक तालुक्यात कोणाचा ठराव असू शकतो, किती ठराव आहेत, त्यांचा स्थानिक नेता कोण, याची माहिती तालुकानिहाय घेतली जात आहे. यासाठी नेत्यांनी त्यांचे खास कार्यकर्ते तालुक्यात सर्व्हेसाठी पाठविले आहेत. निवडणूक पुढील वर्षी असली तरीही ‘गोकुळ’च्या दुधाला आतापासूनच उकळी फुटण्यास सुरुवात झाली आहे.