
गोकुळ दूध संघाला शनिवारपासून दूधपुरवठा थांबवण्याचा निर्णय
esakal
हायलाइट्स (मुख्य मुद्दे)
डिबेंचर रकमेवरून संघर्ष तीव्र: ‘गोकुळ’ दूध संघाने ४५ टक्के डिबेंचर रक्कम शुक्रवार (ता.१०) पर्यंत न दिल्यास उपोषण करण्याचा इशारा जिल्हा दूध उत्पादक संघटनेचे अध्यक्ष ज्योतिराम घोडके यांनी दिला.
दूधपुरवठा बंद करण्याची चेतावणी: शनिवार (ता.११) पासून जिल्ह्यातील दूध उत्पादक ‘गोकुळ’ला दूधपुरवठा थांबवणार, असा निर्णय बैठकीत जाहीर.
पशुपालक अडचणीत: सततच्या डिबेंचर कपातीमुळे दूध संस्थांना दिवाळी रिबेट देणे अवघड, तसेच लंपी व इतर आजारांमुळे पशुपालन संकटात, अशी तक्रार.
Gokul Milk Producers : ‘डिबेंचर ४५ टक्के रक्कम जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकुळ) शुक्रवार (ता.१०) पर्यंत दिली नाही, तर ‘गोकुळ’ कार्यालयाच्या दारात उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच शनिवार (ता.११) पासून जिल्ह्यातील दूध उत्पादक गोकुळला दूध देणार नाहीत’, असा इशारा जिल्हा दूध उत्पादक संघटनेचे अध्यक्ष ज्योतिराम घोडके यांनी आज पत्रकार परिषदेत दिला. यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ॲड. माणिक शिंदे यांच्यासह संस्था पदाधिकारी उपस्थित होते.