Gokul Milk Price Hike: Buffalo Milk Rate Increased by Rs 1.50, Cow Milk by Rs 1
esakal
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात ‘गोकुळ’ने दूध उत्पादकांना मोठा दिलासा दिला आहे. गोकुळकडून म्हैस दूध खरेदी दरात प्रतिलिटर १ रुपया ५० पैसे, तर गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर १ रुपया वाढ करण्यात आली आहे. ११ ऑगस्टपासून हे सुधारित दर लागू होणार आहेत. त्यामुळे गोकुळशी संलग्न दूध उत्पादकांना महिन्याला सुमारे पाच कोटी रुपयांचा अतिरिक्त दर मिळणार आहे.