Gokul Chairman Election Controversy : सहकार कायद्यामध्ये 'गोकुळ'साठी सोईस्कर बदल? स्पष्ट बहुमत नसतानाही महायुतीचा अध्यक्ष बसणार? कोल्हापूरच्या राजकारणात मोठा ट्विस्ट

Gokul Milk Union election latest news : कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघातील सत्ता संघर्ष तीव्र झाला आहे. महायुतीकडून चार शासननियुक्त संचालकांना मतदानाचा अधिकार देण्याची तयारी असून, सहकार कायद्यात बदल होण्याची शक्यता आहे.
Gokul Milk Union election latest news

Gokul Milk Union election latest news

esakal

Updated on: 

मुंबई : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाची सत्ता घेण्यासाठी महायुतीने सहकार कायद्यात सोईस्कर बदल करण्यासाठी हालचाली सुरू केल्या (Gokul Milk Union chairman election 2026) आहेत. सत्तास्थापनेसाठी स्पष्ट बहुमत नसल्याने चार शासननियुक्त (स्वीकृत) संचालक नेमून त्यांना मतदानाचा अधिकार देण्याची तयारी सुरू आहे. सुरुवातीला सहकार खात्याने या प्रस्तावाला विरोध दर्शवला होता; मात्र सत्ताधारी नेत्यांच्या आग्रहामुळे अखेर हे संचालक नेमले जाणार असून, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...