

Kolhapur Gokul Dairy election update
esakal
Gokul Milk Sangh Election Month Update : नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषदेनंतर आता ‘गोकुळ’च्या निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची (गोकुळ) मतदार यादी तयार करण्याचे काम सुरू होणार आहे. साधारण एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत सर्व निवडणूक कार्यक्रम पूर्ण करण्यात येणार आहे. याबाबतची तयारी प्रशासकीय पातळीवर सुरू झाली आहे.