

Satej Patil Gokul Election
esakal
Kolhapur Gokul Election : गोकुळ दूध संघाची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महायुतीकडून हालचाली सुरू असल्याची चर्चा असतानाच काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी ही निवडणूक बिनविरोध होणार नसल्याचे स्पष्ट केले. ‘गोकुळची निवडणूक बिनविरोध होणार आहे,’ या चर्चेबाबत प्रतिक्रिया विचारली असता पाटील यांनी, ‘‘एवढा दिवस जोरदार प्रचार करत फिरत आहे. आणि अचानक बिनविरोधची चर्चा समोर येत आहे. ही निवडणूक बिनविरोध होणार नाही. मी यावर सविस्तर बोलणार आहे,’’ असे सांगितले.