
Gokul Milk Kolhapur
esakal
Gokul Milk Union News : कोल्हापूर जिल्ह्यातील सहकार चळवळीचा कणा मानला जाणारा कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) संघ नेहमीच राजकीय समीकरणांच्या केंद्रस्थानी राहिला आहे. शेतकऱ्यांचा संघ असूनही तिथे निर्णय केवळ आर्थिक किंवा संघटनात्मक राहत नाहीत; ते थेट राजकारणावर परिणाम करणारे ठरतात. नुकत्याच झालेल्या वार्षिक सभेत संचालक मंडळ २१ वरून २५ सदस्य करण्याचा घेतलेला निर्णय हा त्याच पद्धतीचा एक नवा टप्पा आहे. संचालक मंडळ वाढले की राजकीय नेत्यांची ताकद वाढते, मात्र त्यानुसार शेतकऱ्यांच्या घरातली समृद्धी वाढवणे, त्यांच्या कष्टाला न्याय मिळवून देण्याची जबाबदारीही विद्यमानांसह वाढवलेल्या संचालकांवर असणार हे विसरून चालणार नाही.