Gokul Milk Politics Major Turning Point : कोल्हापुरात राजकीय महाभूकंप! 'त्या' अध्यादेशावर राज्यपालांची स्वाक्षरी; सतेज पाटलांना मोठा धक्का, गोकुळमध्ये सत्तेचे पारडे फिरले!

Governor approves ordinance for 4 nominated members : बहुमताचे गणित क्षणात बदलले; ४ स्वीकृत संचालकांना मतदानाचा अधिकार मिळाल्याने महायुतीचा मार्ग मोकळा, ऐन दिवाळीत वातावरण पेटले
Gokul Milk Union Ordinance

Gokul Milk Union Ordinance

Sakal

Updated on: 

पश्चिम महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्राची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) अध्यक्षपदाच्या निवडीवरून सुरू असलेल्या हायव्होल्टेज संघर्षात अखेर राज्य शासनाने सर्वात मोठा कायदेशीर आणि राजकीय डाव टाकला आहे. गोकुळच्या संचालक मंडळात चार अशासकीय (स्वीकृत) सदस्य नेमण्याच्या राज्य मंत्रिमंडळाच्या विशेष अध्यादेशावर (Ordinance) राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी शुक्रवारी स्वाक्षरी केली आहे. राज्यपालांच्या मंजुरीनंतर सहकार विभागाकडून हा अधिकृत अध्यादेश जारी केला जात असून, यामुळे आमदार सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीच्या १३ संचालकांच्या बहुमताला मोठा सुरुंग लागला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Satej Patil Protest March Gokul Milk Union Power Struggle
Satej Patil on Gokul Dudh Sangh
Chief Minister Banner Satej Patil Gokul Milk Union Election Result
Gokul election result latest news