Kolhapur Gold Silver : कोल्हापुरात सोन्या चांदीच्या दर वाढले की कमी झाले, सहा महिन्यांत दर किती वाढले?

Gold and Silver Prices : गेल्या सहा महिन्यांत कोल्हापुरात सोन्या-चांदीच्या दरात किती वाढ झाली? आजचे चालू दर, बाजारातील बदल आणि तज्ज्ञांचा अंदाज जाणून घ्या.
Kolhapur Gold Silver

Gold and Silver Prices in Kolhapur

esakal

Updated on
Summary

हायलाइट्स (मुख्य मुद्दे)

सलग तीसऱ्यादिवशी सोन्या-चांदीच्या दरात झपाट्याने वाढ:

आज सोन्याच्या प्रतितोळा दरात ₹1,900, तर चांदीच्या प्रतिकिलो दरात ₹3,400 ची वाढ; वाढीचा ट्रेंड कायम.

सोनं ₹1.26 लाखांवर, चांदी ₹1.57 लाखांवर:

जीएसटीसह कोल्हापुरात सोने ₹1,26,200 प्रति तोळा, तर चांदी ₹1,57,600 प्रति किलो इतक्या उच्चांकावर पोहोचले.

दिवाळी येईपर्यंतदरात आणखी वाढीचा अंदाज:

सराफ व्यावसायिकांच्या मते, सोन्यात आणखी ₹5,000 व चांदीत ₹7,000–₹8,000 इतकी वाढ होण्याची शक्यता.

सलग तिसऱ्या दिवशी सोने- चांदीचा दर वाढला आहे. आज सोन्याच्या प्रतितोळा दरात १९०० रुपये, तर चांदीच्या प्रतिकिलो दरामध्ये ३४०० रुपयांची वाढ झाली आहे.

Gold Silver Rate : गणेश चतुर्थीपासून सोने आणि चांदीच्या दरामध्ये वाढ होण्यास सुरूवात झाली. सप्टेंबरमध्ये आलेला या वर्षातील अखेरचा गुरुपुष्यामृत योग आणि विजयादशमी मुहूर्तावेळी देखील दरात वाढ झाली होती. गेल्या आठवड्यामध्ये एक आणि तीन ऑक्टोबर रोजी सोने दर जैसे-थे राहिले होते. चांदीच्या दरात पाचशे रुपयांची वाढ झाली होती. रविवारी पुन्हा सोने आणि चांदीच्या दरामध्ये वाढ झाली. त्यानंतर पुढील सलग तीन दिवस दरांमध्ये वाढ झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com