कोरोनातही खरेदीला सोन्याचे दिवस ;  सोने-चांदी, स्मार्ट फोन, इलेक्‍ट्रॉनिक वस्तूला मागणी

Gold days to buy in Corona too; Demand for gold and silver, smart phones, electronics
Gold days to buy in Corona too; Demand for gold and silver, smart phones, electronics

कोल्हापूर : कोरोना महामारीची मरगळ झटकून ग्राहकांनी साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या दसऱ्याच्या मुहूर्तावर खरेदीसाठी गर्दी केली. सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह स्मार्ट फोन, इलेक्‍ट्रॉनिक वस्तू, वाहने, सायकली खरेदीवर भर दिल्याचे दिसून आले. कोरोना महामारीमुळे दसऱ्याच्या मुहूर्तावर व्यापाऱ्यांना अपेक्षित व्यवसाय होईल, अशी अपेक्षा नव्हती. दुपारी तीननंतर रात्री नऊपर्यंत बाजारात गर्दीच गर्दी होती. 
सोन्याच्या दागिन्यावर मजुरीत 40 टक्के सूट, हिऱ्याच्या दागिन्यावर मजुरीत 100 टक्के सूट, पंचवीस हजारांच्या खरेदीवर 2800 रुपयांची पैठणी भेट, अशा एक ना अनेक ऑफर्सचा धमाका होता. जोडव्यांपासून ते हिऱ्यांच्या दागिन्यांच्या खरेदीपर्यंत ग्राहकांची पसंती होती. 
मजुरीवर 40 ते 100 टक्‍क्‍यापर्यंत डिस्काउंट असल्यामुळे खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली होती. गुजरीतील सराफ कट्ट्यांवरही पेढ्यांवर दिवसभर ग्राहकांची गर्दी होती. सायंकाळी ही गर्दी अधिक झाली. मात्र, गुजरी परिसरातील पार्किंगची वाहने काढण्यासाठी पोलिसांची फौज रस्त्यावरून फिरत होती. इलेक्‍ट्रिक वस्तूंमध्ये एलसीडी, होम थिअटर, रेफ्रिजरेटर यांच्यासह पिठाच्या घरगुती गिरणीच्या खरेदीवर ही सूट होती. पंधरा हजारांची गिरणी दहा हजारांपर्यंत दिली जात होती. शिवाजी स्टेडियम परिसरातील इलेक्‍ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीवेळी ग्राहकांसाठी मंडपाची व्यवस्था केली होती. 

कॅशबॅक आणि ऑनलाईन 
ऑनलाईनवर खरेदीसाठी भरघोस डिस्काउंट होता. इतरवेळी 17 हजारांना मिळणारे वॉशिंग मशिन ऑनलाईवर 13,999 पर्यंत उपलब्ध झाले होते. पेटीएमसह इतर ऑनलाईन माध्यमातून खरेदी केल्यास 5 ते दहा टक्‍क्‍यांपर्यंत कॅशबॅक ऑफर होती. ऑनलाईनवरही मोठ्या प्रमाणात खरेदी झाली. मात्र, त्यांच्या उलाढालीचा एकूण आकडा मिळू शकला नाही. 

50 टक्के व्यवसाय होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, प्रत्यक्षात तो 75 टक्‍क्‍यांहून अधिक गेला. पाऊस नसल्यामुळेही ग्राहकांचा उत्साह होता. कोरोनाचा कोणताही परिणाम मुहूर्ताच्या खरेदीवर दिसला नाही. मार्केट नेहमीप्रमाणे सुरू झाले आहे. दिवाळीत इलेक्‍ट्रॉनिक व्यवसायात आणखी वाढ होईल. 
- मुग्धा कुलकर्णी, सारस इलेक्‍ट्रॉनिक्‍स. 

दुचाकी वाहनांत -6 जीच्या बदलामुळे त्यांच्या किमतीत सुमारे 10 ते 15 हजारांपर्यंत वाढ झाली. कोरोना महामारीमुळेही दसऱ्यात सर्व दुचाकी वाहनांची मिळून हजार वाहने खरेदी होतील, असा अंदाज व्यावसायिकांचा होता. मात्र, जिल्ह्यात सुमारे दोन हजार वाहनांची खरेदी झाली आहे. काल एकाच दिवसात 5 कोटींहून अधिक उलाढाल केवळ दुचाकी ऍटोमोबाइल सेस्टरमध्ये झाली. 
- नितीन गायकवाड, विक्री अधिकारी, युनिक ऍटोमोबाइल्स्‌.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com