
सोने, चांदी घेताय बातमी तुमच्यासाठी, चांदी बुकिंग केल्यानंतर तीन आठवड्यांनी मिळणार
esakal
Highlight Summary Points
सोने-चांदीचे दर सातत्याने वाढत आहेत:
कोल्हापूर सराफ बाजारात आज चांदीचा दर प्रतिकिलो १,८५,००० रुपये आणि सोने प्रतितोळा १,२९,१०० रुपये वर पोहोचला आहे, गेल्या एका दिवसातच चांदीच्या दरात सात हजार रुपयांची वाढ झाली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजार आणि औद्योगिक मागणी दर वाढीस कारणीभूत:
सोने-चांदीच्या दरातील वाढ ही ग्राहकांच्या मागणीमुळे नव्हे, तर आंतरराष्ट्रीय आर्थिक बाजार, फंड हाऊस व मध्यवर्ती बँकांच्या खरेदी, अमेरिकेने रशियावर लादलेले निर्बंध आणि औद्योगिक वापरासाठी चांदीची मागणी वाढल्यामुळे होत आहे.
दिवाळीपूर्वी खरेदीची धावपळ आणि पुरवठ्याची कमतरता:
दिवाळीपूर्वी ग्राहकांची सोने-चांदी खरेदीस धावपळ सुरू आहे, मात्र चांदीचा पुरवठा मागणीच्या तुलनेत कमी असल्याने बुकिंग केल्यानंतर सुमारे तीन आठवड्यांची प्रतीक्षा करावी लागते.
Gold Rate Market : गणेशोत्सवापासून सोने-चांदीचे दर वेगाने वाढत आहेत. एका दिवसात तब्बल सात हजार रुपयांनी चांदीचे दर वाढले आहेत. कोल्हापूर सराफ बाजारात आज चांदीचा दर प्रतिकिलो एक लाख ८५ हजार रुपयांवर, तर सोने प्रतितोळा एक लाख २९ हजार १०० रुपयांवर पोहोचले आहेत. या दरांमध्ये दिवाळीपर्यंत आणखी वाढ होण्याची शक्यता सराफ व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.
सोने-चांदीच्या दरामध्ये होणारी वाढ ही दागिने अथवा छोट्या ग्राहकांच्या वाढलेल्या मागणीमुळे नाही, तर ती पूर्णपणे आंतरराष्ट्रीय आर्थिक बाजारावर अवलंबून आहे. बाजारात फंड हाऊस अथवा मध्यवर्ती बँकांनी जोरात सोने खरेदी सुरू केली आहे. या खरेदीमागे अमेरिकेने रशियावर लादलेले निर्बंध हे एक प्रमुख कारण आहे.