

कोल्हापुरात अवघ्या ४८ तासांत दोन ठिकाणी अर्धा कोटी रुपयांचे सोने चोरीला गेले आहे.
esakal
Kolhapur : गेल्या दोन दिवसांत म्हणजे भर दिवाळीत जिल्ह्यात तीन ठिकाणी झालेल्या चोऱ्यांमध्ये पन्नास तोळ्यांहून अधिकच्या सोन्याच्या दागिन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. चांदीचे सुमारे अडीच किलो दागिने आणि रोख रकमही चोरीस गेली आहे. या चोऱ्यांमुळे बाजारभावाप्रमाणे नागरिकांना सुमारे अर्धा कोटींचा फटका बसला आहे. राजोपाध्येनगर आणि गडहिंग्लज येथे बंद बंगले फोडून, तर अंबाबाई मंदिर येथे हे प्रकार घडले आहेत.