
सचिन भोसले
कोल्हापूर : महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करून राष्ट्रीय शालेय क्रीडा, नेहरू कप हॉकी स्पर्धा, सुब्रतो मुखर्जी राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा अशा केंद्रीय स्पर्धांमध्ये सहभाग ते उल्लेखनीय कामगिरी केलेल्या कोल्हापूरच्या २३३ खेळाडूंना राज्य शासनाच्या क्रीडा विभागाने १४ लाख ९५० रुपयांची शिष्यवृत्ती जाहीर केली आहे. ३७५० ते ११ हजार २५० रुपये रक्कम या खेळाडूंच्या खात्यात जमा होणार आहे.