
कोल्हापूर : राज्यातील विविध शाळा-महाविद्यालयांत शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी-विद्यार्थिनींना एसटीचे पास थेट त्यांच्या शाळेत वितरित होणार आहेत. तशा सूचना एसटी महामंडळाचे अध्यक्ष, परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी स्थानिक एसटी प्रशासनाला दिल्या आहेत. या योजनेमुळे विद्यार्थ्यांचा वाया जाणारा शैक्षणिक वेळ, खर्च, श्रम वाचणार आहेत.