
Drug Injection Kolhapur Crime : तरुणांना गांजासह नशिल्या इंजेक्शनची विक्री करणाऱ्या सोहिल संभाजी मोहिते (वय २४, रा. जाधव पार्क, जरगनगर) याला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. रामानंदनगर परिसरात झालेल्या भांडणानंतर तो दुचाकी सोडून पसार झाला होता. त्याच्या दुचाकीत गांजा व इंजेक्शन मिळून आल्याने पोलिसांनी केलेल्या सखोल तपासात रोहन संजय चव्हाण (३३, रा. कवडे गल्ली, कसबा बावडा) व अजय श्रीकांत डुबल (४४, शिंदे मळा, खोतवाडी, हातकणंगले) या पुरवठादारांची नावे निष्पन्न झाली. तिघांनाही अटक करण्यात आली असून, एक लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी सांगितले.