

Gram Panchayat Delimitation
esakal
कोल्हापूर: ग्रामपंचायत निवडणुकीत घर क्रमांकानुसार प्रभागरचना तलाठ्यांना करावी लागते. यासाठीची सर्व माहिती, आकडेवारी, नकाशे हे ग्रापंचायतीकडे असतात. त्यांच्याकडून ही सर्व माहिती घेऊन तलाठ्यांना काम करावे लागते. त्यामुळे प्रभागरचना करण्याचे काम ग्रामपंचायतीनेच करावे, अशी तलाठ्यांची मागणी आहे. शासनाच्या आदेशामुळे तलाठी आपले मूळचे काम सांभाळत हे काम करतात.