कोल्हापूर जिल्ह्यात ग्रामपंचायतींची पोट निवडणूक जाहीर | Byelection | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

election
कोल्हापूर जिल्ह्यात ग्रामपंचायतींची पोट निवडणूक जाहीर

कोल्हापूर जिल्ह्यात ग्रामपंचायतींची पोट निवडणूक जाहीर

कोल्हापूर - राज्यातील ग्रामपंचायतीमधील सुमारे सात हजाराहून अधिक रिक्त जागांसाठी आज निवडणूक जाहीर करण्यात आली. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील 139 ग्रामपंचायतीचा समावेश आहे.

जिल्ह्यातील 139 ग्रामपंचायती मधील 194 रिक्त जागांसाठी पोट निवडणूक होणार आहे. 21 डिसेंबरला मतदान होणार असून 22 नोव्हेंबरला तहसीलदार याबाबतची अधिसूचना जाहीर करणार आहेत. याची आचारसहिता आज पासून लागू करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सध्या विधान परिषद निवडणूक आचारसंहिता असल्यामुळे या नव्या आचारसंहितेचा फारसा परिणाम जाणवणार नसल्याचे दिसून येते.

हेही वाचा: 'या' दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत सतेज पाटील करणार उमेदवारी अर्ज दाखल

जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये कमी जादा प्रमाणात रिक्त जागा आहेत. तेथे ही निवडणूक होणार आहे. जिल्ह्यातील सर्वात अधिक ग्रामपंचायती चंदगड तालुक्यातील असून सर्वात कमी कागल तालुक्यात आहेत. पोटनिवडणूक साठी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. 22 नोव्हेंबरला याबाबत सविस्तर माहिती संबंधित तहसीलदार अधिसूचनेद्वारा प्रसिद्ध करणार आहेत.

loading image
go to top