Grandfather died but She was cremated like a son given fire by his grandson
Grandfather died but She was cremated like a son given fire by his grandson

लहानपणीच हरपले आई बापाचे छत्र अन् आता नियतीने तिचे मायेचे छत्रही घेतले हिरावून

Published on

हुपरी (कोल्हापूर) : माता-पित्याचे छत्र लहानपणीच हरपलेले. आजी आजोबांनी लाडाने सांभाळ केला, पण नियतीने तिचे ते मायेचे छत्रही आज हिरावून नेले. तिच्या आजोबांचे  निधन झाले, पण स्वतःला सावरत डबडबलेल्या डोळ्यांनी आजोबांच्या चितेला अग्नी देत एखाद्या पुत्राप्रमाणे तिने अंतिम संस्कार केले. येथील प्रेरणा राजू कांबळे व दत्तात्रय शंकर कांबळे (वय ७४) या आजोबा नातीची ही कहाणी. 

दत्तात्रय निवृत्त शिक्षक होते. त्यांना चार मुली व एक मुलगा. नात प्रेरणा हिच्या जन्मानंतर काही दिवसांतच मुलगा राजू याचे निधन झाले. काही दिवसांनी ती मातृप्रेमालाही पोरकी झाली. त्यामुळे प्रेरणाच्या पालनपोषणाची वेळ आजोबा दत्तात्रय व आजी कुमुदिनी यांच्या वाट्याला आली. आज पहाटे दत्तात्रय यांचे हृदयविकाराच्या धक्‍याने निधन झाले. प्रेरणाने आजोबांच्या चितेला भडाग्नी दिला.

हिंदू संस्कृती मध्ये वडिलांच्या मृत्यूनंतर मुलाने अग्नी देण्याची प्रथा आहे. मात्र या कुटुंबामध्ये मुलगा नातीच्या  जन्मानंतर काही दिवसातच त्याचे निधन झाले. त्यामुळे  निधनानंतर त्यांच्या नात्याने त्यांचे अंत्यसंस्कार केले. आजोबांच्या जाण्याने तिच्या आयुष्यात खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे. लहानपणीच वडिलांचे छत्र हरवले आणि आता आजोबांचे छत्र हरवले यामुळे या मुलीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com