Panhala Accident News : नातीचा चेहरा पाहून परतणाऱ्या आजीवर काळाचा घाला, पन्हाळ्यातील घटनेने हळहळ

Panhala latest news : नातीला भेटून परतत असताना आजीवर काळाने घाला घातल्याची दुर्दैवी घटना पन्हाळ्यात घडली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Panhala Accident News kolhapur

Panhala Accident News kolhapur

esakal

Updated on

grandmother death incident : घरी नात झाल्याचा आनंदसोहळा...नातीचा चेहरा पाहण्याची आजीला आतुरता....शासकीय रुग्णालयात पोहोचून नातीला डोळे बघून पाहिलेही... घरी जाताना दुचाकीवरून पडल्याने आजीचा जागीच मृत्यू झाला. खोपकर कुटुंबाच्या आनंदावर विरजण पडल्याची ही घटना आज सायंकाळी माजगाव फाट्यावर घडली. शारदा शिवाजी खोपकर (वय ५५, रा. वाघवे, ता. पन्हाळा) असे मृत्युमुखी पडलेल्या आजीचे नाव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com