
Kolhapur : कोल्हापूरच्या चित्रनगरीत ‘पोस्ट प्रोडक्शन’साठी उच्च दर्जाच्या तंत्रज्ञानासह भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेतर्फे (एफटीआय) चित्रपट शिक्षण दिले जाईल. या वर्षातच त्याची सुरुवात होईल. तसेच येथे मराठी चित्रपटांसाठी योगदान दिलेल्या कलाकारांची माहिती देणाऱ्या दालनाची स्थापना केली जाईल, अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशीष शेलार यांनी आज येथे केली.