
गोकुळ शिरगाव : कणेरीवाडी (ता. करवीर) येथील एका वाहतूक व्यावसायिक कंपनीची कर सल्लागारानेच जीएसटी नंबरचा गैरवापर करून सुमारे ३ कोटी २८ लाखांची फसवणूक केल्याची तक्रार गोकुळ शिरगाव एमआयडीसी पोलिसांत दाखल झाली. याप्रकरणी संशयित कर सल्लागार वीरेंद्रकुमार कृष्णा पाटील (रा. माधवनगर, गणेश मंदिरानजीक, कणेरीवाडी, ता. करवीर, मूळ गाव कोथळे, ता. गडहिंग्लज) याला पोलिसांनी अटक केली; तर त्याची पत्नी प्रियंका वीरेंद्रकुमार पाटील यांच्यावरही गुन्हा नोंद झाला असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.