ग्रामपंचायतींमध्ये महाविकास आघाडीचाच करिश्‍मा राहणार  पालकमंत्री सतेज पाटील 

Guardian Minister and Congress District President Satej Patil Appeal on kolhapur people
Guardian Minister and Congress District President Satej Patil Appeal on kolhapur people
Updated on

कोल्हापूर : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये गटा-तटाचे राजकारण असते. तरीही, कोल्हापूर जिल्ह्यात कॉंग्रेसचे जास्तीत-जास्त सदस्य विजयी होतील. यामध्ये, कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व महाविकास आघाडी ग्रामपंचायतीच्या निवडणूकीमध्ये आपला करिश्‍मा दाखवतील, अशी आशा कोल्हापूरचे पालकमंत्री आणि कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांनी आज व्यक्त केली. 


श्री पाटील म्हणाले, प्रत्येक जिल्ह्यात आणि राज्यात महाविकास आघाडीचा प्रभाव जास्त आहे. गावागावात हा प्रभाव दिसून येणार आहे. ग्रामपंचायत निवडणूक गटा-तटाची असते. तरीही, या ठिकाणीही महाविकास आघाडीचे सदस्य आणि सरपंच झालेली दिसतील. गावपातळीवरील तिन्ही पक्षाचे पदाधिकारी आणि नेते याच प्रकारचा अजेंडा घेवून काम करत आहेत. राज्यात महाविकास आघाडीचा एकूणच सर्व कारभार पाहिला तर, लोक आता महाविकास आघाडीलाच पंसती देत आहेत.

जिल्ह्यातील 433 पैकी जास्तीत-जास्त ग्रामपंचायतींमध्ये कॉंग्रेस व महाविकास आघाडीच सत्तेवर असेल यात वादच नाही. जिल्ह्यातील कॉंग्रेसच्या सर्व नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांनाही ग्रामपंचायतींमध्ये कॉंग्रेस व महाविकास आघाडीचे प्राबल्य असेल यासाठी प्रयत्नशील राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानूसार गावागावातील कार्यकर्ते ग्रामपंचायतींमध्ये कॉंग्रेस आणि महाविकास आघाडीचीच सत्ता येईल यासाठी प्रयत्नशील आहेत. तसे नियोजनही केले जात असल्याचेही श्री पाटील यांनी सांगितले. 


कोरोना संसर्गाच्या  पार्श्‍वभूमीवर गावागावातील निवडणूका शांततेत आणि सुरक्षित पार पडाव्यात यासाठी सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे. प्रशासन व शासकीय अधिकाऱ्यांनी प्रत्येकाला आपले काम योग्य व काटेकोरपणे करावे, असे आवाहनही श्री पाटील यांनी केले आहे. 

 संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Eknath Shinde Hasan Mushrif devendra fadanvis gokul milk politics
Kolhapur Ratnagiri Highway bridge construction stopped
Shivaji University Hostel food issue news shivsena protest
Shiroli Assault Case Update
Marathi News Esakal
www.esakal.com