कोल्हापूर : ‘बँका तत्काळ कर्ज देत नाहीत, मग गोरगरिबांना खासगी सावकारांकडून कर्ज घ्यावे लागते. खासगी सावकारांचा विळखा आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गावर घट्ट बसलेला आहे. ही आर्थिक गुलामगिरी तोडण्यासाठी सहकार आणि पोलिस विभागाने (Police Department) अनधिकृत सावकारीवर नियंत्रण ठेवून गोरगरिबांना न्याय द्यावा. सावकाराशी संबंधित तक्रारीवर तातडीने कारवाई करावी’, असे आदेश पालकमंत्री प्रकाश आबिटकर (Prakash Abitkar) यांनी दिले.