केसांना आला सोन्याचा भाव; किलोभरच्या बदल्यात ग्रॅमभर सोने

आता चक्क सोन्याचा भाव मिळत असल्याने गळलेले केस सांभाळून ठेवण्याचा प्रकार वाढला आहे.
hair
hairesakal
Summary

आता चक्क सोन्याचा भाव मिळत असल्याने गळलेले केस सांभाळून ठेवण्याचा प्रकार वाढला आहे.

कुंभोज : महिलांच्या गळलेल्या केसांना सध्या सोन्याचा भाव मिळत आहे. किलोभर केसांच्या बदल्यात चक्क ग्रॅमभर सोने देखील विकत घेता येवू येते. यापूर्वी केसावर फुगे आणि भांडी मिळत होती. मात्र आता चक्क सोन्याचा भाव मिळत असल्याने गळलेले केस सांभाळून ठेवण्याचा प्रकार वाढला आहे. ५० ग्रॅम केसांना २०० रूपयांहून अधिक भाव मिळत आहे.

hair
एक वेळ होती 9 रुपयांना मटण थाळी, अनलिमिटेड तांबडा-पांढरा मिळायचा

पूर्वी गल्लोगल्ली केसांवर फुग्यांची खरेदी केली जायची. मग यावर केसात घालायची क्लीप, पिन, मुंबई मिठाई अशा काही वस्तू खरेदी होत असतं. यानंतर फुग्याची जागा भांड्यांनी घेतली. आता मात्र वजनावर केसांची खरेदी केली जात आहे. दीड वर्षापूर्वी २ हजार रूपये किलोने विकले जाणारे केस सध्या दुप्पट भावाने खरेदी केली जात आहेत. विदेशात भारतीय केसांना मोठी मागणी आहे. त्यापासून विंग, हेअर पिसेस बनविले जातात.

मागील वर्षभरापासून लॉकडाऊनमुळे केस खरेदीवर मोठा परिणाम झाला होता. आता या व्यवसायाला तेजी आली आहे. केसांच्या बदल्यात स्टिल, प्लास्टिकच्या वस्तू खरेदी केल्या जातात. केस खरेदीमध्ये आता जुने कपडे खरेदीदार उतरले आहेत. त्यांनी रोख रक्कमे ऐवजी स्टील, जर्मनची भांडी आणि प्लास्टिकच्या वस्तू देणे सुरू केले आहे. महिलांचा असा व्यवहार करण्याकडे मोठा कल दिसून येतो आहे.

hair
कोकण किनारी व्हेल माशाची 'उलटी' सापडण्याचं प्रमाण का वाढलं?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com