

Mango Market Rate
esakal
Alphonso Mango Rate : फळबाजारात हापूस आंबा दाखल झाला आहे. आवक जेमतेम असल्याने प्रतिडझन ३ हजारापर्यंत दर आहे. प्रतीक्षेत असणाऱ्या देशी बोरांची आवक सुरू झाली आहे. थंडी वाढत असल्याने स्ट्रॉबेरीची मागणी वाढली आहे. फूलबाजारात फुलांचे वाढलेले भाव टिकून आहे. मागणी आणि आवक यांचा ताळमेळ काहिसा बसत नसला तरी दरावर फारसा परिणाम होताना दिसत नाही. लग्नसराईमुळे गुलाबाला मागणी असून गुलाबाचे भाव कधी आवाक्यात तर कधी आवाक्याबाहेर जात आहेत.