Haranya Bull Story : 'हरण्या' बस नाम ही काफी है! नाद करती का? सलग १०० मैदान मारल्यात, वाऱ्यासारख्या पळणाऱ्या हरण्या बैलाची कहाणी...

Legendary Racing Bull : बैलगाडीच्या आरत-परत मैदानातील 'किंग' अशी ओळख असलेल्या 'हरण्या' बैलाने सलग १०० मैदानात पहिला येण्याचा मान नुकताच मिळवत आपले वर्चस्व राखले आहे.
Haranya Bull Story

Haranya Bull Story

esakal

Updated on
Summary

हरण्या बैलाची विक्रमी कामगिरी – जत तालुक्यात जन्मलेला, कोल्हापूरचे संदीप पाटील यांचा ९ वर्षांचा ‘हरण्या’ बैल सलग १०० मैदानात पहिला येण्याचा विक्रम करत बैलगाडी शर्यतीत ‘किंग’ ठरला आहे.

देखणी व ताकदवान बांधा – साडेसहा फूट उंची, चंद्रकोरीसारखी शिंगे, गोलसर शरीरयष्टी, वेगवान चाल व कसदार वळणे हे त्याचे वैशिष्ट्य; बाशिंग भवरा या बैलासोबत ३० वेळा प्रथम क्रमांक मिळवला.

काळजी व चाहत्यांचा ओघ – विशेष आहार, व्यायाम, पोहणे व मालिश यामुळे त्याची क्षमता टिकली आहे; समाजमाध्यमांवर त्याला हजारो फॅन्स असून आतापर्यंत ४० चांदीच्या गदा, २५ दुचाकी, ५०० ढाली जिंकल्या आहेत.

Haranya 100 Arena wins : बैलगाडीच्या आरत-परत मैदानातील 'किंग' अशी ओळख असलेल्या 'हरण्या' बैलाने सलग १०० मैदानात पहिला येण्याचा मान नुकताच मिळवत आपले वर्चस्व राखले आहे. अशी कामगिरी करणारा तो अलीकडच्या काळातील एकमेव बैल ठरला आहे. जत तालुक्यात जन्मलेला हरण्या या कामगिरीने बैलगाडी शौकिनांच्या गळ्यातील ताईत बनला असून 'बस नाम ही काफी है' असे त्याच्याबाबतीत म्हटले जाते. हिंदकेसरी किताब विजेता या बैलाचे वैशिष्ट्य म्हणजे जोडीच्या सगळ्या बैलांसोबत तो पळाला आहे. फाटीवरून वायुवेगाने निघण्याचे व फिरून वळताना त्याचे कसब वाखाणण्यासारखे आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com