
जयसिंगपूर : कुरुंदवाड नगरपालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी आशिष बाबूसिंग चौहान, त्यांचे वडील बाबूसिंग परबतसिंग चौहान आणि आई मीना बाबूसिंग चौहान या तिघांनी राजस्थान येथे घर व पुण्यात प्लॉट घेण्यासाठी आपला शारीरिक, मानसिक छळ करीत जिवे मारण्याची धमकी दिली असल्याची फिर्याद विशाखा आशिष चौहान यांनी जयसिंगपूर पोलिस ठाण्यात दिली. फिर्यादीनुसार आशिष चौहान यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.