

Harshvardhan Patil from Shahuwadi Turukwadi Clears UPSC
esakal
Rural Student UPSC Success : जिद्द, चिकाटी आणि एकत्र कुटुंबाच्या भक्कम पाठबळावर कोल्हापूर जिल्ह्यातील शाहुवाडी तालुक्यातील तुरुकवाडी येथील सुपुत्र हर्षवर्धन हरिश्चंद्र पाटील यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ३४९ वा रँक मिळवून देदीप्यमान यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशामुळे जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, ग्रामीण भागातील युवकांसमोर त्यांनी एक नवा आदर्श निर्माण केला आहे.