
गडहिंग्लज : ‘कोल्हापूर जिल्ह्यात शासनाची अधिकाधिक वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. सांगावला आयुर्वेदिक महाविद्यालय, उत्तूरला योग आणि नैसर्गिक उपचार महविद्यालय मंजूर करून उभारणी सुरू केली आहे. या ठिकाणी आयुर्वेदिक, होमिओपॅथी वैद्यकीय शिक्षणाची सोय असल्याने आता शासकीय दंत महाविद्यालय गडहिंग्लजला सुरू करण्याचा प्रयत्न आहे. यासाठी ३० एकर जागेचा शोध सुरू असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज येथे दिली. महिलांच्या गर्भाशय कर्करोगाला अटकाव करणाऱ्या 'एचपीव्ही' लसीकरण मोहिमेचा रामनवमीला प्रारंभ करत असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले.