
'मविआ'नं घेतलेले निर्णय शिंदे-फडणवीस सरकार राजकीय हेतुने मोडित काढतंय
सध्या राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीने घेतलेल्या निर्णयांना स्थगिती देत असल्याचे चित्र आहे. यामुळे विरोधी गटातील नेत्यांकडून आता प्रतिक्रिया येण्यास सुरवात झाली आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस आणि मुख्यमंत्र्यांनी राजकीय हेतूने महाविकास आघाडीने घेतलेले निर्णय मोडित काढत असून याची अमंलबजावणी आणि परिणाम याचा अभ्यास होण्याची गरज असल्याचे मत माजी मंत्री मुश्रीफ यांनी मांडले आहे. महाविकास आघाडी सरकारने कोणते राजकीय हीत साधण्यासाठी निवडणुकांमध्ये बदल केला नव्हता, तर जे व्यवहार्य आहे ते पाहूनच निर्णय घेतल्याचे मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं आहे. (kolhapur political News)
यावेळी बोलताना मुश्रीफ यांनी शिंदे गटाच्या सरकारला काही गोष्टींची जाणीव करुन दिली आहे. ते म्हणाले की, जनतेमधून निवडूण आलेले सरपंच हे सदस्यांना विचारात न घेताच निर्णय घेतात. गावस्तरावर मनमानी कारभार होतो आणि त्याचा विकासावरही परिणाम होतो. त्यामुळे सदस्यातून सरपंचाची निवड हा निर्णय घेण्यात आला होता. शिवाय याबाबतचा प्रस्ताव त्यावेळी एकनाथ शिंदे यांनीच ठेवला होता. त्यानुसारच तो निर्णय झाला. यावर आता फेरविचार होणे गरजेचे असल्याचे मुश्रीफांनी सूचवलं आहे.
हेही वाचा: इटलीचे PM मारियो यांची राजीनाम्याची घोषणा, राजकीय भुकंपामुळे चर्चा
पुढे ते म्हणाले की, बाजार समिती सभापतीच्या निवडणुकीत थेट शेतकऱ्यांचा सहभाग शक्य आहे का? हा निर्णय व्यवहार्य नाही ते शिंदे सरकारच्या लवकरच लक्षात येईल. तेव्हा त्यांना माघार घ्यावी लागणार आहे असंही त्यांनी सांगितलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पेट्रोलरील 5 रुपये आणि डिझेलवर प्रति लिटर 3 रुपये कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, यामुळे जनतेच्या खिशावर फार मोठा सकारात्मक परिणाम होईल असे नाही. सध्याच्या दरवाढीमुळे दराच्या गणितात फारसा बदल होणार नाही. त्यामुळे या निर्णयामुळे सर्वसामान्यांना महागाईतून दिलासा मिळेल असेही नसल्याचे मुश्रीफ म्हणाले आहेत.
दरम्यान, गेल्या दोन दिवसांमध्ये शिंदे सरकराने घेतलेल्या निर्णयावरुन विरोधकांकडून टीका केली जात आहे. जनतेमधून लोकप्रतनिधी निवडला तर गाव स्तरावर होणाऱ्या परिणामांचा कोणताही अभ्यास या सरकारने केला नाही. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच मांडलेल्या प्रस्तावावरुन सदस्यातून सरपंच हा निर्णय झाल्याचेही मुश्रीफ म्हणाले. आता त्यांच्यावर ही नामुष्की ओढावली असल्याने कदाचित त्यांनी आपल्या विचारात आणि निर्णयात बदल केल्याचा खोचक टोलाही त्यांनी लगावला आहे.
हेही वाचा: कोल्हापूरकरांचा नादखुळा, रिक्षावाल्या काकांनी महानगरपालिकेला केलय ट्रोल
Web Title: Hasan Mushrif Criticized To Shinde Fadanvis Govt On Sopped Decision Of Mahavikas Adhadi Govt
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..