Kolhapur KMC I कोल्हापूरकरांचा नादखुळा, रिक्षावाल्या काकांनी महानगरपालिकेला केलय ट्रोल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kolhapru

एका रिक्षावाल्या काकांनी चक्क कोल्हापूर महापालिकेला ट्रोल केलं आहे.

कोल्हापूरकरांचा नादखुळा, रिक्षावाल्या काकांनी महानगरपालिकेला केलय ट्रोल

राज्यासह अनेक भागात पावसाची संततधार अजूनही सुरुच आहे. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील आणि गावांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोल्हापूर, सातारा आणि सांगली येथील अनेक नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. पावसाची सतंतधार कायम असल्याने नाल्यांचे पाणी रस्त्यावर आले आहे. दरम्यान, कोल्हापुरातून आता एक वेगळी बातमी समोर येत आहे. एका रिक्षावाल्या काकांनी चक्क कोल्हापूर महापालिकेला ट्रोल केलं आहे. (poster viral from auto rickshaw driver in kolhapur)

पावसाच्या पाण्यामुळे नाल्यातून पाणी रस्त्यावर येते आणि वाहतूकीला अडथळा निर्माण होत आहे. तर अनेक ठिकाणी रस्त्यांची परिस्थिती बिकट असल्याने नागरिकांना प्रवास करताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. यामुळे अनेक ठिकाणी पावसाळ्यात अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळ जीव मुठीत घेऊन नागरिकांना प्रवास करावा लागतो.

हेही वाचा: ट्विटर पुन्हा एकदा Down, जगभरातील यूजर्संकडून सोशल मीडियावर तक्रार

दरम्यान, यावर एका रिक्षावाल्याने नामी शक्कल काढत कोल्हापूर महापालिकेला ट्रोल केलं आहे. या रिक्षावाल्याने एक पोस्टर तयार केले असून ते रिक्षाच्या मागे लावले आहे. रिक्षाल्या काकांनी हे पोस्टर स्वत: तयार केले असल्याची माहिती मिळाली आहे. यावर लिहलंय, पाण्यात लवकर विरघळणार पदार्थ कोणता असा एक प्रश्न केला आहे. यावर मीठ आणि साखर असे पर्याय दिले असून उत्तरात मात्र 'महापालिकेचे डांबर' असं लिहलं गेलं आहे. त्यामुळे या पोस्टवरील मजकूर हा कोल्हापुरात चर्चेचा विषय ठरला आहे.

पावसाळ्यात नाल्यातील पाणी रस्त्यावर येते त्यामुळे वाहतूकीला समस्या निर्माण होतात. याशिवया रस्त्यावरील खड्ड्यांमुळे कोल्हापुरातील नागरिक नाराज आहेत. दरवर्षी लोकांना या समस्यांचा सामना करावा लागतो. यातून अनेकांना अपघातासारख्या समस्यांचाही सामना करावा लागतो. दरम्यान, आता या पोस्टरमुळे महापालिका यावर का अॅक्शन घेणार पहावे लागणार आहे.

हेही वाचा: Jammu Kashmir : जवानांमध्ये वादातून गोळीबार; दोन ठार, तर दोघे जखमी

Web Title: Poster Village From Auto Rickshaw Driver Of Trolling To Kolhapur Municipal Corporation

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top