esakal | कार्यकर्ते कट्ट्यावर बोलत होते; मुश्रीफांना आधीच समजलेलं सोमय्या नाव घेणार
sakal

बोलून बातमी शोधा

hasan mushrif

हसन मुश्रीफ यांच्याविरोधात आपल्याकडे २७०० पानांचा पुरावा असल्याचा दावाही सोमय्यांनी केला आहे.

कार्यकर्ते कट्ट्यावर बोलत होते; मुश्रीफांना आधीच समजलेलं सोमय्या नाव घेणार

sakal_logo
By
टीम ई सकाळ

कोल्हापूर - ठाकरे सरकारच्या डर्टी घोटाळा ११ खेळाडुंनंतर आता राखीव म्हणून हसन मुश्रीफ असल्याचं म्हणत भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर १२७ कोटींच्या घोटाळ्याचा आऱोप केला. तसंच हसन मुश्रीफ यांच्याविरोधात आपल्याकडे २७०० पानांचा पुरावा असल्याचा दावाही सोमय्यांनी केला आहे. याला उत्तर देताना हसन मुश्रीफ यांनी हे सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचं म्हटलं आहे. तसंच महाविकास आघाडीचं सरकार अस्थिर करण्यासाठी भाजपकडून असे आरोप केले जात असल्याचं मुश्रीफांनी म्हटलं. मी राज्यात १७ वर्षे मंत्री, एकदाही चौकशी झाली नाही. सोमय्यांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करणार आहे. त्यांना तारखेला इथं यावं लागेल तेव्हा माहिती घ्यावी. त्यांनी कोल्हापुरात येऊन रहावं, मतपरिवर्तन होईल असा सल्लाही मुश्रीफांनी किरीट सोमय्यांना दिला.

आयकर विभागाने याआधीही आमच्या निवासस्थानावर धाड टाकली होती. त्यांच्या हाताला काहीच मिळालं नाही. अडीच वर्षात काय कारवाई झाली नाही. आम्हाला जे विचारलं, चौकशी केली त्याची उत्तरं आम्ही दिली असल्याचं मुश्रीफांनी यावेळी सांगितलं. तसंच सोमय्यांना चंद्रकांत पाटील आणि समरजीत घाटगेंनी वास्तविक माहिती दिली नाही. सोमय्या बिचारे आहेत, त्यांना काही माहिती नाही, त्यांना दोषी धरू नका असेही मुश्रीफ म्हणाले.

हेही वाचा: सोमय्या बिचारे, त्यांना दोष देऊ नका; मुश्रीफांचे कार्यकर्त्यांना आवाहन

सोमय्या आज आपल्यावर आरोप करणार असल्याचं आधीच समजलं असल्याचंही मुश्रीफांनी यावेळी सांगितलं. समरजीत घाटगेंची भूमिका काय आहे असं विचारलं असता ते म्हणाले की, बाकीचे सुद्धा माहिती द्यायला आहेतच. त्यांचे कार्यकर्ते दबक्या आवाजात चर्चा करत होते, आज किरिट सोमय्या मुश्रीफांवर बोलणार आहेत. म्हणून मी कालच तुम्हाला निरोप दिले होते. काल संध्याकाळी तुम्हाला निरोप दिले होते.

हेही वाचा: मुश्रीफांचा पलटवार, सोमय्यांविरोधात दाखल करणार १०० कोटींचा दावा

बेनामी मालमत्ता सापडल्याचा आरोप केला. पण मग तेव्हाच आम्हाला धरून नेलं असतं. धाड टाकली पण त्यांच्या हाती काहीच लागलं नाही. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धाडीचे प्रकार होते. कारखान्यांचे व्यवहार असतात त्याची माहिती सहज मिळते. त्याची पाच हजार पानं मिळतील असे म्हणत किरीट सोमय्यांच्या २७०० पानी पुराव्यांच्या पानांच्या मुद्द्यावर हसन मुश्रीफ यांनी उत्तर दिलं.

loading image
go to top