

Hasan Mushrif Makes Big Statement On Satej Patil Says No Contribution In Gokul Court Battle In Kolhapur
sakal
कोल्हापूर: सर्वोच्च न्यायालय, सर्किट बेंचमध्ये संस्थांना आम्ही पाठबळ दिले, आमच्या खांद्यावर बसून आमदार सतेज पाटील तिथे गेले. संस्थांनी सहा महिने जो संघर्ष केला, न्यायालयीन लढा दिला, त्यात त्यांचे एक टक्काही योगदान नाही. संस्थांची सहानुभूती मिळवण्यासाठी आता ते त्यांना पाठबळ देण्याचे सांगत आहेत, असा टोला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी लगावला.