'शुक्‍लांच्या फोनची सीडीआर तपासावेत' : हसन मुश्रीफ

hasan mushrif press conference criticised on devendra fadnavis in kolhapur
hasan mushrif press conference criticised on devendra fadnavis in kolhapur
Updated on

कोल्हापूर : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय कायदामंत्री रवीशंकर प्रसाद यांनी बेकायदेशीर करण्यात आलेल्या फोन टॅपिंगचा आधार घेवून राज्य सरकारवर आरोप केले आहेत. या खोट्या आरोपांनी राज्याची मोठी बदनामी झाले आहे. त्यामुळे फडणवीस व प्रसाद यांनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी, अशी मागणी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत केली. तसेच बेकायदेशीर फोन टॅपिंग करणाऱ्या व अपक्ष आमदारांना भाजपकडे वळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिस आयुक्‍त रश्‍मी शुक्‍ला यांची चौकशी करावी, त्यांच्या फोनचे सीडीआर अहवाल मागवावेत, अशी मागणीही मुश्रीफ यांनी केली. 

मुश्रीफ म्हणाले, आयपीएस अधिकारी रश्‍मी शुक्‍ला यांनी बेकयादेशीर फोन टॅपिंग केले. यामध्ये आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची माहिती मिळवून त्याचा अहवाल सादर केला होता. आठ महिन्यापुर्वी सादर झालेल्या अहवालाची सर्व माहिती माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कशी मिळाली, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. शुक्‍ला यांच्या माहितीच्या आधारेच फडणवीस यांनी थयथयाट करत दिल्लीपर्यंत हा विषय नेला. तसेच राज्य सरकारवरही आरोप केले. केंद्रीय कायदा मंत्री रवीशंकर प्रसाद यांनीही आरोप केले. दरम्यान राज्य शासनाने राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी शुक्‍ला प्रकरणी चौकशी करुन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना अहवाल सादर केला आहे. 

कुंटे यांच्या अहवालानुसार बहुतांश वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या या पोलिस आस्थापना विभागाच्या शिफारशीनेच झाल्या आहेत. यातील काही बदल्याच आस्थापना शिफारशी बाहेरच्या होत्या. त्यामुळेच फडणवीस यांनी केलेले आरोप हे तकलादू व लवंगी फटाक्‍यासारखे असल्याचे स्पष्ट झाले आहे. म्हणूनच आता फडणवीस व प्रसाद यांनी खोट्या आरोपाबद्दल राज्याच्या जनतेची माफी मागावी, अशी मागणी मुश्रीफ यांनी केली. 

24 ऑक्‍टोबर 19 निकाल तेव्हापासून ते 24 नोव्हेंबर 19 म्हणजे सरकार स्थापन होईपर्यंत रश्‍मी शुक्‍ला या अपक्ष आमादारांच्या संपर्कात होत्या. अनेक अधिकाऱ्याना कामाला लावले होते. राज्यमंत्री यड्रावकर यांनी दुजारो दिला आहे. ही माहिती मिळाल्यानंतर शरद पवार यांच्यासमोर उघड केली होती. अपक्ष आमदारांना रश्‍मी शुक्‍ला या भाजपला पाठिंबा द्यावा यासाठी लाखो रुपयांच्या ऑफर देत होत्या, असा घणाघाती आरोप मुश्रीफ यांनी केला. भाजप सत्ता येण्यासठी त्या प्रयत्न कराव्यात. आयपीएस अधिकाऱ्यांनी अशा कामात असणे हे गंभीर. त्यामुळे अपक्ष आमदारांनी केलेल्या फोन प्रकरणाची चौकशी करावी, याबाबतचे सीडीआर जप्त करुन शुक्‍ला यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. 

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडवणी यांनी राणा भिमदेवी थाटात पत्रकार परिषद घेवून हा अहवाल दिल्लीला घेवून जाणार असल्यचे सांगिले. यानंतर तो अहवाल गृह सचिवांना दिला. या अहवालात आता काही दम नसल्याचे स्पष्ट झाले असून आता विरोधी पक्षनेत्यांनी सत्ता गेल्यामुळे जो थयथयाट सुरु केला आहे तो आता थांबवावा, अशी सुचनाही त्यांनी केली. केंद्रीय मंत्री रविशंकर यांनीही या प्रकरणात आरोप करुन महाराष्ट्राची बदनामी केली आहे. त्यामुळे माजी मुख्यमंत्री फडणवीस व कायदामंत्री रवीशंकर प्रसाद यांनी महाराष्ट्रातील जनतेची माफी मागावी, तसेच राज्यात महाविकास आघाडीचे सरकार भक्‍कम आहे. हे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून सुरु आहे. मात्र त्यांना यश आलेले नाही. त्यामुळे फडणवीस यांनी आता राज्यात पुन्हा सत्तेवरे पाहण्याचे सोडून द्यावे, असा टोलाही त्यांनी लगावला. 

तपास भरकटवण्याचा प्रयत्न 

अंबानींच्या घरासमोर स्फोटके ठेवणे व मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास झालाच पाहिजे. या घटनांच्या मागे कोण आहे, याची माहिती पुढे येणे आवश्‍यक आहे. मात्र या विषयावरचे लक्ष विचलित करणे व तपास भरकटण्यासाठीच प्रयत्न सुरु असल्याचा आरोप मुश्रीफ यांनी केला. एटीएसने वरील घटनांचा तपास केला असता तर खरे मास्टरमाईंड दोन दिवसात पुढे आले असते. मात्र तसे होताना दिसत नाही. मात्र केंद्राच्या सुचनेनुसार राज्यात काम सुरु असल्याचा आरोप त्यांनी केला. 

शुक्‍लांच्या फोनची सीडीआर तपासावेत 

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात अनेक अधिकाऱ्यांची पोस्टींग झाली आहे. त्यामुळे असे अधिकारी फडणवीस यांच्यासाठी काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच 24 ऑक्‍टोबर 2019 ते राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येण्याच्या पूर्वसंध्येपर्यंत म्हणजेच 24 नोव्हेंबर 2019 या कालावधीतील रश्‍मी शुक्‍ला यांच्या फोनचे सीडीआर अहवाल घ्यावेत. या कालावधीत शुक्‍ला यांनी अनेक अपक्ष आमदारांना फोन करुन भाजप सोबत येण्याची ऑफर दिली होती, असा आरोप मुश्रीफ यांनी केला. तसेच फोन टॅपिंग प्रकरणी शुक्‍लांवर मुख्यमंत्र्यांनी योग्य ती कारवाई, अशी मागणीही केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com