KDCC : अध्यक्षपदी हसन मुश्रीफ तर उपाध्यक्षपदी राजूबाबा आवळे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

hasan mushrif

KDCC : अध्यक्षपदी हसन मुश्रीफ तर उपाध्यक्षपदी राजूबाबा आवळे

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांची बिनविरोध निवड झाली. सलग दुसऱ्यांदा त्यांना अध्यक्षपदाची संधी मिळाली आहे. तर उपाध्यक्ष पदी आमदार राजू आवळे यांना विराजमान होता आले आहे. बँकेचे निवडणूक निर्णय अधिकारी अरुण काकडे यांच्या अध्यक्षतेखाली या निवडी झाल्या.

हेही वाचा: चर्चेसाठी एकत्र; निवेदिता माने, मंत्री यड्रावकर विरोधकांच्या बैठकीत

जिल्हा बँकेचा अध्यक्ष ठरवण्यासाठी आज सत्तारूढ गटाच्या १८ संचालकांसह नेत्यांची सकाळी शासकीय विश्रामगृहावर बैठक झाली. या बैठकीत दोन्ही पदांचे उमेदवार निश्चित झाले. त्यानंतर दुपारी तीन वाजता होणाऱ्या संचालकांच्या बैठकीत या दोन्ही नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. अध्यक्ष पदासाठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व आमदार पी. एन. पाटील अध्यक्ष पदाचे प्रमुख दावेदार असल्याचे आतापर्यंत दिसत होते. दरम्यान मुश्रीफ यांनी पुन्हा बाजी मारली आहे.

बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सत्तारूढ काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजप मित्र पक्षांनी २१ पैकी १८ जागांवर विजय मिळवला आहे. शिवसेनेला तीन जागा मिळाल्या आहेत. सत्तारूढ गटातून विजयी झालेल्या राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर व माजी खासदार श्रीमती निवेदीता माने या सेनेच्याच असल्याचा दावा यापुर्वीच करण्यात आला होता. यांची भूमिका काही महत्वाची होती.

हेही वाचा: कोल्हापूर - KDCC अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीत सेनेची गुगली

तसेच सत्तारूढ गटाच्या नेत्यांनी प्रक्रिया व पतसंस्था गटात विश्वासघात केल्याचा ठपका आमदार विनय कोरे यांनी ठेवला आहे. त्यातून प्रचंड नाराज झालेल्या श्री. कोरे यांनी दोन दिवसांपुर्वी श्री. मुश्रीफ, माजी आमदार के. पी. पाटील यांची भेट घेऊन तुमच्यासोबत मला गृहीत धरू नका असा इशारा दिला आहे. त्यामुळे आजच्या बैठकित श्री. कोरे कोणती भुमिका घेणार याविषयी उत्सुकता होती.मात्र ही निवड सामोपचाराने झाल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Hasan Mushrif Raju Awale Name Confirm As Chairman And Vice Chairman Of Kdcc Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top