

Gokul Election Hasan Mushrif Reaction
esakal
Hasan Mushrif Latest Statement : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत मतमोजणीचे कल स्पष्ट होत असतानाच मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दूध उत्पादक सभासद शेतकऱ्यांनी दिलेला निकाल आम्ही स्वीकारत आहोत, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच महायुतीमध्ये शेवटपर्यंत सुरू असलेली भांडणे आणि त्यानंतर झालेली युती कदाचित लोकांना आवडली नसावी, अशी टिप्पणीही त्यांनी केली.