Hasan Mushrif Setback : हसन मुश्रीफांना दणका! गडहिंग्लज नगराध्यक्षांसह आजरा सभापतींचा जातीचा दाखला अवैध

Ajra Panchayat Samiti Chairman : कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. गडहिंग्लज नगराध्यक्ष आणि आजरा सभापती यांचे जातवैधता प्रमाणपत्र अवैध ठरल्याने हसन मुश्रीफ गटाला मोठा राजकीय धक्का बसल्याची चर्चा आहे.
Hasan Mushrif

Hasan Mushrif

esakal

Updated on

Gadhinglaj Nagaradhyaksha Caste Certificate : गडहिंग्लजचे नगराध्यक्ष महेश तुरबतमठ, आजरा पंचायत समितीच्या सभापती सौ. जयश्री गाडे यांच्यासह पट्टणकोडोली गटाचे जिल्हा परिषद सदस्य महेश पाटील यांचे जातीचे दाखले अवैध ठरले आहेत. दीर्घ काळ चाललेल्या सुनावणीनंतर जात पडताळणी समितीने हा निर्णय दिला. दरम्यान, या जात पडताळणी समितीच्या निर्णयानंतर यासंदर्भात तक्रार केलेल्या विरोधकांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करून एकच जल्लोष केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com