

हसन मुश्रीफांचा सार्वजनिक बांधकाम विभागावर संताप
esakal
Kolhapur Political News : ‘सर्वसामान्यांच्या वैद्यकीय उपचाराचा आधार असलेल्या सीपीआर रुग्णालयाच्या अद्ययावतीकरणाचे काम दिवाळीपूर्वी पूर्ण करण्याचे माझे ध्येय होते. मात्र, ते झाले नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभागावर मी थोडा नाराज आहे. आता कोणतेही कारण न देता या विभागाने फेब्रुवारीपर्यंत सीपीआरचे काम पूर्ण करावे’, अशी सूचना वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी दिली.