
Satej Patil Political Role : वाशिमच्या पालकमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचे वक्तव्य वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी काल सांगलीत केले. यापूर्वी त्यांनी असेच वक्तव्य कागलमध्येही केले होते. याला मुहूर्त केव्हाचा असेल याबाबतचा निर्णय त्यांनी संचालक मंडळावर सोडला आहे. त्यामुळे खरोखरच ते राजीनामा देणार काय, याबाबतही तर्कवितर्क लढवले जात आहेत.