Two-Wheeler Accident on Hatkanangale
esakal
हातकणंगले (कोल्हापूर) : हातकणंगले - कुंभोज रोडवर नेज हद्दीतील लक्ष्मी मंदिरासमोरील धोकादायक वळणावर दोन भरधाव दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक (Two-Wheeler Accident on Hatkanangale) झाल्याने रुई (ता. हातकणंगले) येथील आकाश अजित अबदान (वय २१) हा तरुण ठार झाला तर तिघे गंभीर जखमी झाले. काल दुपारच्या सुमारास हा अपघात झाला.