esakal | हातकणंगले मुख्याधिकाऱ्यांसह चौघांना कोरोनाची लागण
sakal

बोलून बातमी शोधा

Hatkanangale Nagar Panchayat Chief infected with covid 19 and 4 member covid infected

कोरोना रुग्णसंख्येने हातकणंगलेत दिडशेचा टप्पा गाठला आहे.

हातकणंगले मुख्याधिकाऱ्यांसह चौघांना कोरोनाची लागण

sakal_logo
By
अतुल मंडपे

हातकणंगले (कोल्हापूर) : हातकणंगले नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यासाहित आज चौघांचे अहवाल पॉझिटीव्ह आल्याने कोरोना रुग्णसंख्येने हातकणंगलेत दिडशेचा टप्पा गाठला आहे. दरम्यान मुख्याधिकारीच कोरोना बाधित झाल्याने बुधवारपासून तीन दिवस नगरपंचायत कार्यालय बंद ठेवण्यांत येणार आहे.


 सुरवातीच्या टप्प्यांत हातकणंगलेत कोरोना रुग्णाची संख्या शून्य होती. मात्र १५ जुलैला शहरांत पहिला रूग्ण सापडला. तेव्हापासून दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. अवघ्या दिड महिन्यांत कोरोना बांधितांच्या संख्येने दिडशतक गाठले आहे. मात्र यातील १०२ रुग्ण बरे होऊन परतले आहेत. ही दिलासादायक बाब आहे.आजवर तीन जणांचा कोरोनांमुळे मृत्यू झाला असून अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या सध्या ४४ आहे.

हेही वाचा- यंदा उसाची कांडी करणार हाडाची काडं -


 गेल्या काही दिवसांपासून मुख्याधिकाऱ्यांना त्रास जाणवत होता. त्यामुळे ते विलगीकरण कक्षांत दाखल झाले होते. काल त्यांचा स्वॅब तपासणीसाठी दिला होता. आज सकाळी स्वॅबचा अहवाल पॉाझिटीव्ह आला आहे. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांसाहित, कर्मचारी, पदाधिकारी यांचे स्वॅब तपासणीसाठी दिले जाणार आहेत.

हेही वाचा-मायक्रोफायनान्सबाबत दुष्टचक्रातून  महिलांना बाहेर काढणार ; हसन मुश्रीफ -


 आज नगरपंचायत कार्यालयांत औषध फवारणी करून घेतली असून सुरक्षिततेचा उपाय म्हणून येणारे तीन दिवस कार्यालय कामकाजासाठी बंद ठेवण्यांत येणार आहे. दरम्यांन होम क्वारंटाईनचा शिक्का हातांवर असलेले काही जण शहरांत, नगरपंचायत कार्यालयांत राजरोसपणे फिरत असल्याने संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

संपादन - अर्चना बनगे

loading image
go to top