कोल्हापूर : शाळा सोडल्याचे दाखले (School Leaving Certificate) देण्यासाठी तीन हजारांची लाच घेणाऱ्या प्रभारी मुख्याध्यापकास (Headmaster) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti-Corruption Department) अटक केली. संजय जयसिंग नार्वेकर (वय ५२, रा. सांगाव रोड, दत्त कॉलनी, कागल) असे संशयिताचे नाव आहे. महापालिकेच्या लक्ष्मीपुरीतील शेलाजी वन्नाजी विद्यालयात (Shelaji Vannaji Vidyalaya) काल सकाळी ही कारवाई झाली.