
गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या सातत्यानं त्यांच्यावर गंभीर आरोप करत आहेत.
Hasan Mushrif : मुश्रीफांच्या तिन्ही मुलांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर 'या' दिवशी सुनावणी
Hasan Mushrif : माजी मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या अडचणी थांबण्याचं नाव घेत नाही. गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या सातत्यानं त्यांच्यावर गंभीर आरोप करत आहेत. काही दिवसांपूर्वी ED नं ही त्यांच्या घरावर छापेमारी केली होती, त्यामुळं ते आणखीनच अडचणीत सापडलेत.
आता ED कडून हसन मुश्रीफ यांच्याविरोधात 35 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात (Money Laundering Case) गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यांच्या तिन्ही मुलांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात (Mumbai Sessions Court) अर्ज दाखल केला. त्यांनी दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर सोमवारी 6 मार्चला सुनावणी होणार आहे.
हसन मुश्रीफ यांची मुलं नाविद, आबिद आणि साजिद यांच्या अटकपूर्व जामिनाला ईडीकडून विरोध करण्यात आला आहे. मुश्रीफ यांच्या मुलांच्या वतीनं ज्येष्ठ वकील आबाद पोंडा, अमित देसाई आणि प्रशांत पाटील बाजू मांडत आहेत. दरम्यान, संताजी घोरपडे साखर कारखान्यात फिर्यादी आणि इतर लोकांना भागभांडवल देतो, असं म्हणून फसवणूक केल्याप्रकरणी मुश्रीफांविरोधात मुरगूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 40 कोटींची फसवणूक केल्याची फिर्याद विवेक विनायक कुलकर्णी (रा. कागल) यांनी दिलीये.