
Rain Update Kolhapur : गेल्या दहा दिवसांपासून उघडझाप करणाऱ्या तरण्या पावसाने सोमवारी मध्यरात्रीपासून आज दुपारपर्यंत मुसळधार हजेरी लावली. जिल्ह्यातील सर्वच धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाली. यामुळे नद्यांच्या पातळी झपाट्याने वाढ झाली. पंचगंगा नदीची पाणी पातळी गेल्या चोवीस तासांत सहा फूट सहा इंचांनी वाढली. वारणा धरणातून विसर्ग वाढवून तो ८५३० क्युसेकवर नेण्यात आला असून, पाणी वाढल्याने ३२ बंधारे पाण्याखाली गेले. दरम्यान, राधानगरी धरण ८७ टक्के भरले असून, अद्याप ३१०० क्युसेक विसर्ग सुरू आहे. दरम्यान, शहरातही रात्रीपासून सकाळपर्यंत पावसाने जोरदार हजेरी लावली.