esakal | सावधान ! मध्यरात्रीला चोरी होतायेत लाखोंच्या किमतीचे कारटेप
sakal

बोलून बातमी शोधा

the high amount of car steps theft from ruikar colony area of kolhapur from four wheeler car

चोरट्यांनी मोटारीच्या डाव्या बाजूच्या काचा दगडाने फोडून कारटेप लंपास केले.

सावधान ! मध्यरात्रीला चोरी होतायेत लाखोंच्या किमतीचे कारटेप

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : शिवाजी पार्क, रुईकर कॉलनी, शिवराज कॉलनी परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला. मध्यरात्री सहा मोटारींच्या काचा फोडून चोरट्यांनी त्यातील लाखाच्या किमतीचे कारटेप लंपास केले. याची नोंद शाहूपुरी पोलिस ठाण्यात झाली.

शिवाजी पार्क, रुईकर कॉलनी, कदमवाडी रोडवरील शिवराज कॉलनीत उच्चभ्रू लोकवस्ती आहे. या भागातील नागरिकांनी आलिशान मोटारी पार्किंग केल्या होत्या. चोरट्यांनी मोटारीच्या डाव्या बाजूच्या काचा दगडाने फोडून कारटेप लंपास केले. हे प्रकार आज सकाळी उघडकीस आले.

हेही वाचा - प्राचीन काळापासून जोतिबा डोंगरावर सुरू असलेली ही परंपरा आजही अखंडीत -

परिसरात सहा मोटारींतून टेप चोरले आहेत. यात दोन मोटारींच्या प्रत्येकी एक लाख रुपये किमतीच्या कारटेपचा समावेश आहे. याबाबत शिवाजी पार्क येथील अमिष भवानभाई पटेल यांनी फिर्याद दिली. त्यानुसार दोन लाख ४५ हजार रुपये किमतीचे टेप चोरीला गेल्याची नोंद झाली. चारचाकीतून आलेल्या चोरट्याने सीसीटीव्हीही फोडल्याची चर्चा परिसरात सुरू होती.

पूर्वीही चोऱ्या

गेल्या दोनेक वर्षांत याच परिसरात मोटारीच्या काचा फोडून चोरट्यांनी किमती कारटेप लंपास केले होते. ठराविक काळात हे कृत्य करून चोरटे पसार होतात. याचा तत्काळ छडा लावावा, अशी मागणी होत आहे.

हेही वाचा - मराठा आरक्षण समतेचा लढा ; लोकप्रतिनिधीनी एकत्र यावे -

संपादन - स्नेहल कदम 

loading image
go to top