
Italian Fashion Brand Prada : कोल्हापुरी चप्पलची नक्कल केल्याचा आरोप करणारी जनहित याचिका बुधवारी (ता. १६) उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. इटालियन फॅशन ब्रॅंण्ड ‘प्राडा’ने नक्कल केल्याचा आरोप करणाऱ्या याचिकाकर्त्यांच्या वैधानिक अधिकारावरच न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले. याचिकाकर्ते हे कोल्हापुरी चप्पलचे नोंदणीकृत मालक नाहीत आणि त्यांचे कोणतेही नुकसान झालेले नाही, असेही याचिका फेटाळताना नमूद करण्यात आले.