

कोल्हापूर जिल्ह्यातील १० नगरपरिषदा आणि तीन नगरपंचायतींसाठी आज मतदानाला सुरूवात झाली.
esakal
Kolhapur Political News : (नरेंद्र बोते) कोल्हापूर जिल्ह्यातील १० नगरपरिषदा आणि तीन नगरपंचायतींसाठी आज मतदानाला सुरूवात झाली. यापूर्वी २०१६ मध्ये या निवडणुका झाल्याने तब्बल नऊ वर्षांनी या तेरा ठिकाणी मतदान होत आहे. प्रशासक जाऊन तेथे पुन्हा लोकराज्य येण्यासाठी पन्हाळा, मलकापूर, वडगाव, हुपरी, हातकणंगले, जयसिंगपूर, शिरोळ, कुरुंदवाड, गडहिंग्लज, आजरा, चंदगड, कागल आणि मुरगूड येथे यंत्रणा सज्ज झाली आहे.
दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील हायव्होल्टेज लढत होत असलेल्या कागल नगरपरिषदेमध्ये किरकोळ वादावादी झाल्याची घटना समोर आली आहे तर हातकणंगले नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक ४ मध्ये मतदान मशीन बंद पडल्याची घटना घडली आहे. याव्यतिरिक्त जिल्ह्यात मतदान शांततेत सुरू असले तरी चूरस पहायला मिळत आहे.