
चंदगड : हेरे (ता. चंदगड) मंडल हे चंदगड तालुक्यातील सर्वाधिक पावसाचे क्षेत्र बनले आहे. महसूल विभागाने मंडलनिहाय पर्जन्यमापक बसवल्यामुळे पावसाची आकडेवारी समोर आली आहे. हेरे पाठोपाठ चंदगड मंडलचा नंबर लागतो. त्यामुळे घाटमाथ्याचा परिसर पावसाच्या दृष्टीने समृद्ध असतो हेही सिध्द होत आहे. या मंडलमध्ये दररोज 60 ते 80 मिलिमीटर आणि मुसळधार वृष्टी होते त्यावेळी 120 मिलिमीटर पेक्षाही अधिक पावसाची नोंद होते.
तिलारीनगर, हेरे, पाटणे, जंगमहट्टीचा परिसर तिलारीच्या घाटाला लागून आहे. अरबी समुद्रावरुन येणारे पाण्याचे ढग घाटमाथ्यावर आल्यावर बरसायला सुरवात होतात. त्यामुळे या विभागात अधिक पाऊस पडतो. चंदगड मंडलचा भाग हा तिलारी आणि आंबोली घाटमाथ्याला संलग्न आहे. त्यामुळे चंदगड आणि नागनवाडी मंडलमध्येही चांगली पर्जन्यवृष्टी होते. त्यापुढे तुर्केवाडी, कोवाड, माणगाव मंडल परिक्षेत्रात जाईपर्यंत ढगातील पाणी कमी झालेले असते.
माणगाव आणि कोवाड मंडल हे अगदी पूर्व भागात येत असल्याने या विभागात अत्यंत कमी पर्जन्यमान होते. पावसावर आधारित या विभागातील शेती आणि संस्कृती पहायला मिळते. अधिक पावसाच्या पश्चिम भागात चिखलामध्ये भाताची रोप लावण केली जाते तर पूर्व भागात पाऊस कमी असल्याने धुळवाफ पेरणी होते. यात्रा, जत्रा, सण, उत्सव यामध्येही या दोन विभागात फरक दिसून येतो.
दरम्यान, गेल्या आठवडाभरात हेरे मंडलमध्ये 811 मिलिमीटर पाऊस नोंदवला आहे. त्यापाठोपाठ चंदगड मंडलमध्ये 593 मिलिमीटर, नागनवाडीमध्ये 498 मिलिमीटर, तुर्केवाडी 435 मिलिमीटर, कोवाड 266 मिलिमीटर आणि माणगावमध्ये केवळ 128 मिलि मीटरची नोंद झाली आहे.
पर्यावरण संवर्धन जबाबदारी
चंदगड तालुक्याला निसर्गाची देणगी आहे. पाऊस हा त्याचाच एक भाग. पावसाची जपणूक करण्यासाठी पर्यावरण रक्षण आणि संवर्धन ही इथल्या प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे.
- प्रा. एच. के. गावडे, भोगोली
kolhapur
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.